जिल्ह्यात आज ४९ कोरोनाबाधितांची वाढ

Foto
जिल्ह्यात आज ४९ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही १५५४० वर जाऊन पोहचली आहे. 

आज सकाळी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यतील एकूण कोरोनाबधित १५५४० रुग्णांच्या संख्येपैकी आतापर्यंत ११५२१ जण बरे झाले तर आतापर्यंत ५०३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याने सध्या ३५१६ रुग्णांवर उपचार सुरु आहे. 
शहरात ३८ रुग्ण
शहरात ३८ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात एन सहा सिडको-१, बन्सीलालनगर-१, क्रांतीनगर-४, मिलिट्री हॉस्पीटल, छावणी -१, सिडको एन पाच, श्रीनगर-१, शहानूरमियाँ दर्गा परिसर -१, प्रकाशनगर-३, समृद्धी नगर,एन चार सिडको-१, मुकुंदवाडी-१, औरंगपुरा-२, संभाजी कॉलनी,एन सहा सिडको-१, संतोषीमाता मंदिर, मुकुंदवाडी -१, मल्हार चौक, गारखेडा-१, कांचनवाडी -१, शिवशंकर कॉलनी -२, बालाजीनगर -१, जे सेक्टर, मुकुंदवाडी -१, शिवनेरी कॉलनी -१, विष्णूनगर, आकाशवाणी -१, न्यू विशाल नगर, गजानन मंदिर परिसर-१, एस टी कॉलनी, फाजिलपुरा-१, एन नऊ, पवननगर-२, मातोश्रीनग!र, पुंडलिकनगर -१, सातारा पोलिस स्टेशन परिसर-१, नागेश्वरवाडी -१, राजाबाजार-१, कर्णपुरा, छावणी परिसर-१, अहिल्याबाई होळकर चौक, पदमपुरा -२, इतर -१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे. 
ग्रामीण भागात ११ रुग्ण
ग्रामीण भागातील ११ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात बाजारगल्ली, अब्दीमंडी-१, आयोध्यानगर, बजाजनगर-२, बीएसएनएल गोडाऊन जवळ, बजाजनगर -३, जय हिंद चौक, बजाजनगर-१, गणेश सोसायटी आंबेडकर चौक, बजाजनगर -१, शफेपूर, कन्नड -१, पिंप्री राजा-१, सारंगपूर, गंगापूर -१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे. 
तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू 
खासगी रुग्णालयातील एन बारा हडकोतील ५२ वर्षीय पुरूष आणि जाधववाडीतील ४९ वर्षीय रुग्ण, अरिहंत नगरातील ६१ वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker